Top 100 Headlines | टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा | 30 April 2025 | ABP Majha
जम्मू-काश्मीरमधील हॉटेल मालक, टूर आणि ट्रॅव्हल ऑपरेटर्सना प्रवाशांकडून कॅन्सलेशन चार्जेस न घेण्याच्या सूचना, जम्मू-काश्मीर सरकारनं दिला आदेश.
शौर्य चक्र मिळालेल्या मुदस्सीर शेख यांची आई शमीमा बेगम यांना पाकिस्तानात नेण्यासाठी त्यांच्या उरी येथील घरातून नेण्यात आल्याचा दावा. सरकारने या निर्णयाचा फेरविचार केला पाहिजे मेहबुबा मुफ्तींची मागणी..
पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखालील CCS,CCPA आणि CCEAच्या बैठका पार. दिल्लीत झालेल्या बैठकांमध्ये सुरक्षेवर मंथन झाल्याची माहिती.
सिंधू जल कराराविषयी गृहमंत्री अमित शाहांच्या निवासस्थानी बैठक, महत्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता.
मोदी सरकारला जे काही करायचंय त्याला पूर्ण पाठिंबा. सरकारच्या निर्णयाला जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुलांचं समर्थन. अणुहल्ल्याची धमकी देणाऱ्या पाकिस्तानलाही फारूख यांनी सुनावलं.
एनआयएचं पथक पुन्हा एकदा बैसरनमध्ये दाखल. एनआयए टीम बैसरन व्हॅलीमध्ये 3D मॅपिंग करणार. दहशतवाद्यांच्या पळून जाण्याच्या मार्गाची माहिती 3D मॅपिंगद्वारे मिळणार